टीम इंडियाचा माजी कर्णधार असलेल्या एमएस धोनीने (MS Dhoni) आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे, पण त्याच्या चाहत्यांची संख्या मात्र कमी झालेली नाही. धोनीचे चाहते अजूनही त्याला मैदानात पाहण्यासाठी, त्याला भेटण्यासाठी आणि त्याच्यासोबत वेळ घालवण्याचं स्वप्न बघत असतात. धोनीने काहीच दिवसांपूर्वी त्याच्या अशाच एका चाहत्याचं स्वप्न पूर्ण केलं.
देव नावाच्या एका चाहत्याला धोनी हिमाचल प्रदेशच्या रत्नारीमध्ये जाऊन भेटला. देवने ही संपूर्ण कहाणी इन्स्टाग्रामवर शेयर केली आहे. काहीच दिवसांपूर्वी धोनी आपल्या कुटुंबासोबत हिमाचल प्रदेशमध्ये गेला होता. यावेळी धोनी रत्नारीमधल्या मीनाबाग हॉटेलमध्ये थांबला. शिमल्याच्या एका हॉटेलमध्ये काम करणाऱ्या देवला धोनी इकडे आल्याचं कळलं, तेव्हा त्याने आपल्या मॅनेजरला रत्नारीला ट्रान्सफर करायला सांगितलं. धोनीला जेव्हा हे कळलं तेव्हा त्याने रत्नारीला जायचं ठरवलं.
2005 सालीही देवने धोनीला भेटण्याचा प्रयत्न केला होता, पण सुरक्षेच्या कारणामुळे त्याला धोनीला भेटता आलं नाही. आयपीएलच्या सेकंड राऊंडमध्ये धोनी पुन्हा एकदा चेन्नईचं नेतृत्व करताना दिसेल. या स्पर्धेचा पहिला राऊंड भारतात झाला होता, पण कोरोना व्हायरसमुळे स्पर्धा स्थगित करण्यात आली होती. (instagram/Sakshi Dhoni)