सुरेश रैनाने आयपीएलच्या 13व्या मोसमातून माघार घेतली. आयपीएल खेळण्यासाठी रैना चेन्नईच्या टीमसोबत युएईला गेला, पण अचानक त्याने भारतात परतण्याचा निर्णय घेतला. रैनाच्या या निर्णयामुळे चेन्नईची टीम त्याच्यावर चांगलीच नाराज झाली. एवढच नाही तर चेन्नई सुपरकिंग्ज रैनाचा करारही रद्द करू शकते, अशा बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत. जर असं झालं तर रैना पुढच्या मोसमापासून चेन्नईच्या पिवळ्या जर्सीमध्ये दिसणार नाही.