आयपीएलच्या (IPL 2021) यंदाच्या मोसमाला 9 एप्रिलपासून सुरूवात होत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians) आणि रॉयल चॅलेंजर्स बँगलोर (RCB) यांच्यामध्ये पहिला सामना होणार आहे. टी-20 क्रिकेट हा बॅट्समनचा खेळ आहे, असं म्हणलं जात असलं तरी टीम चांगल्या बॉलर्सच्या जीवावर सामने जिंकतात, हे आपण अनेकदा पाहिलं आहे. आयपीएलमधली सगळ्यात यशस्वी टीम असलेल्या मुंबई इंडियन्सकडे उत्कृष्ट बॉलर्सची फौज आहे.
आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या बॉलरच्या यादीत पाचव्या क्रमांकावर हरभजन सिंग आहे. हरभजन सिंग हा आयपीएलमध्ये सर्वाधिक काळ मुंबईकडूनच खेळला, यानंतर चेन्नई आणि आता तो केकेआरसोबत आहे. हरभजनच्या नावावर आयपीएलमध्ये 150 विकेट आहेत. या लीगमध्ये त्याने एकदा 5 विकेटही घेतल्या आहेत. (Harbhajan Singh Instagram)
पियुष चावलाने (Piyush Chawala) आयपीएलच्या 164 मॅचमध्ये 156 विकेट घेतल्या आहेत. टॉप-5 विकेट घेणाऱ्या खेळाडूंमध्ये पियुष तिसऱ्या क्रमांकावर आहे. त्याने दोनवेळा मॅचमध्ये 4 विकेट घेतल्या आहेत. 17 रन देऊन 4 विकेट ही पियुष चावलाची सर्वोत्तम कामगिरी आहे. त्याचा इकोनॉमी रेटही 7.87 आहे. या मोसमात पियुष चावला मुंबईकडून खेळणार आहे.