शमीच्या पत्नीने 'वन-पीस' मध्ये शेयर केला PHOTO, धर्माच्या नावावर झाली ट्रोल
टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची पत्नी हसीन जहां (Haseen Jahan) कायमच वादात सापडते. याआधी हसीन जहांला राम मंदिराबाबत एक पोस्ट केल्यामुळे बलात्काराची धमकीही मिळाली होती.
टीम इंडियाचा फास्ट बॉलर मोहम्मद शमी (Mohammad Shami) याची पत्नी हसीन जहां (Haseen Jahan) कायमच वादात सापडते. यावेळी तिने सोशल मीडियावर एका काळ्या रंगाचा वन-पीस घालून फोटो पोस्ट केला. यानंतर तिला धर्माच्या नावावर ट्रोल करण्यात आलं.
2/ 5
हसीन जहांने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर एक फोटो शेयर केला, पण काही जणांना तिचा हा फोटो आवडला नाही. तिच्या या फोटोवर ट्रोलर्सनी काही कमेंटही केल्या, पण अनेकांनी तिच्या या फोटोचं कौतुक केलं.
3/ 5
हसीन जहांने याआधीही तिचे काही बोल्ड फोटो सोशल मीडियावर शेयर केले होते, तेव्हाही तिच्यावर धर्मावरून निशाणा साधण्यात आला होता.
4/ 5
'जमाने में हस्ती वही है, जिसके हौसले का कोई ठिकाना नहीं,' असं कॅप्शन हसीनने या फोटोला दिलं. यावर काहींनी मुस्लिम धर्माचा दाखला दिला, तर काहींनी तिने चुकीचे कपडे घातल्याचं सांगितलं.
5/ 5
याआधी हसीन जहांला राम मंदिराबाबत एक पोस्ट केल्यामुळे बलात्काराची धमकीही मिळाली होती. यानंतर तिने पोलिसांत तक्रार दिली होती. हसीन जहां मॉडेलिंगही करते.