भारतीय क्रिकेट टीमचा गोलंदाज मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ त्यांच्या वैवाहिक आयुष्यामुळे नेहमीच चर्चेत असतात. पती मोहम्मद शमीसोबत असलेल्या वादामुळे हसीन ही गेल्या अनेक दिवसांपासून मुलीसोबत वेगळी राहत आहे. कोलकाता येथील न्यायालयानं मोहम्मद शमी आणि त्याची पत्नी हसीन जहाँ यांच्याबाबत एक महत्त्वाचा निर्णय दिला आहे.
मात्र, हसीन जहाँ या निर्णयावर खूश नाही. ती आता या निकालाविरोधात उच्च न्यायालयात अपील करू शकते. कारण 2018 मध्ये हसीन जहाँने महिन्याला 10 लाख रुपये पोटगी मिळावी, अशी मागणी करणारी कायदेशीर याचिका दाखल केली होती. या याचिकेत तिनं म्हटलं होतं की, मला वैयक्तिक खर्चासाठी 7 लाख रुपये आणि मुलीच्या संगोपनासाठी दरमहा 3 लाख रुपये पोटगी हवी आहे.
शमी म्हणाला होता, 'हसीन आणि तिचे कुटुंबीय म्हणत आहेत की सर्व मुद्द्यांवर बसून चर्चा करू. पण त्यांना कोण भडकावत आहे, हे मला माहीत नाही. माझ्या वैयक्तिक आयुष्याबद्दल जे काही आरोप करण्यात आलेत, ते पूर्णपणे खोटे आहेत. माझ्याविरुद्ध काहीतरी मोठं षडयंत्र रचलं जातंय. माझी बदनामी करण्याचा किंवा करिअर संपवण्याचा हा प्रयत्न आहे. देशाशी गद्दारी करण्यापेक्षा मी मृत्यू पत्करेन,’ असेही शमीनं म्हटलं होतं.