

मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा आज 46वा वाढदिवस आहे. क्रिकेटच्या मैदानावर सचिनला खेळताना पाहणं अनेकांसाठी पर्वणी असते. दरम्यान सचिनच्या कार कलेक्शनसाठीही अनेकजण त्याचे चाहते आहेत.


सचिनच्या कार कलेक्शच्या चाहत्यांसाठी खास त्याच्या ताफ्यामध्ये याआधी आणि आता असणाऱ्या गाड्यांचा नजराणा...


modified BMW i8. (फोटो सौजन्य : Darshan Shinde Photography) बीएमडब्ल्यू आय8 ही स्पोर्ट्स कार सचिनसाठी खास कस्टमाईज्ड करण्यात आली होती. सचिन स्वतः 2012 पासून BMW चा ब्रँड अँबॅसेडर आहे. या मॉडिफाईड गाडीचा रंगसुद्धा खास सचिनला हवा म्हणू लाल आणि पांढरा रंगवण्यात आला होता.


Nissan GT-R (फोटो सौजन्य : Clinton Pereira Photography) ही गाडी सचिनचा एके काळी जीव की प्राण होती. निस्सानची ही लक्झरी कार असूनही कंपनीने खास सचिनसाठी या आलिशान गाडीत आणखी काही आरामदायी बदल करून मेड टू ऑर्डर लक्झरी कार तयार करून दिली होती. सचिनने 2017 मध्ये ही गाडी विकली.


BMW X5M SUV(फोटो सौजन्य : Acierto Multi Trade Pvt Ltd) बीएमडब्ल्यू X5M ही निळ्या रंगाची गाडी सचिनकडे होती ती त्याने 2018 ऑगस्टमध्ये 21 लाखाला विकली. M कॅटेगरीतल्या SUV गाड्या त्या वेळी भारतात अगदीच दुर्मीळ होत्या. आपल्या ताफ्यातली सगळ्यात जास्त त्याने हीच गाडी पळवली असेल.


Ferrari 360 Modena (फोटो सौजन्य : Team-BHP) फेरारी 360 मॉडेना ही खरोखर प्रत्येकाची ड्रीम कार असू शकते. त्यातून सचिनला ही गाडी मिळालेय वेगाचा बादशहा - फॉर्म्युला 1 चा चँपियन मायकेल शुमारक याच्याकडून. डॉन ब्रॅडमनच्या 29 कसोटी शतकांची सचिनने बरोबरी केली तेव्हा 2000 साली शुमाकरने ही भन्नाट गाडी त्याला भेट दिली होती. काही वर्ष ती सचिनच्या ताफ्यात होती. मग त्याने सुरतच्या एका व्यापाऱ्याला विकली.


Fiat Palio : ही गाडी सचिनला Fiat कडून गिफ्ट देण्यात आली होती. 2000 साली ही गाडी त्याच्या ताफ्यामध्ये आली होती. त्यावेळी सचिन Fiat चा ब्रँड अम्बासिडर होता.


सचिनच्या कँडिड फोटोंपैकी असणारा हा फोटो त्याच्या मेहनतीची साक्ष देतो. मारूती 800 आजही अनेकांकडे आहे. त्यावेळी ही गाडी घेण्याचं स्वप्न मध्यमवर्गातील अनेकांचं होतं. अगदी सचिनचही! सचिनने स्वतः खरेदी केलेली ही अर्थातच पहिली गाडी. 1983 मध्येच सचिनला ही गाडी घ्यायची होती. त्या वेळी भारतात मारुती 800 नुकतीच लाँच झाली होती. पण प्रत्यक्षात सचिनला ती घेता आली 1989 साली. आज कोट्यवधींच्या गाड्यांचा मालक असूनही अद्याप त्याने त्याची ही आवडती गाडी विकलेली नाही