PHOTOS : विराट कोहलीशी करायचं होतं लग्न; इंग्लंडच्या या क्रिकेटरने सर्वांसमोर केलं होतं प्रपोज
दिसायला अत्यंत सुंदर अशा या क्रिकेटरचे भारतातही खूप चाहते आहेत. इंग्लंडच्या या विश्वविजेत्या क्रिकेटपटूने भारतीय कर्णधार विराट कोहलीला सोशल मीडियावर लग्नासाठी प्रपोज केलं होतं


2017 मध्ये इंग्लंडला वर्ल्ड चॅम्पियन बनविण्यात महत्वाची भूमिका बजावणारी डेनियली व्याट हिला जितकं प्रेम तिच्या देशातून मिळतं तितकचं प्रेम भारतातून दिलं जात आहे. तिचे भारतात बरेच चाहते आहेत. यामागील सर्वात मोठे कारण म्हणजे तिचे भारत आणि तेथील जनतेशी असलेले प्रेम.


22 एप्रिल 1991 रोजी स्टॉक ऑन ट्रेंट येथे जन्मलेल्या डेनियलीने मार्च 2010 मध्ये भारताविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. इतकेच नाही तर तिने टी -20 ची सुरुवात भारताविरुद्ध खेळून केली होती.


2017 मध्ये डॅनियलची आयसीसी महिला टी -20 टीम ऑफ दे इयरमध्ये निवड झाली होती. 2018 मध्ये तिने भारताविरुद्धच्या कारकिर्दीतील दुसरे टी -20 शतक झळकावले.


या स्टार इंग्लिश खेळाडूला भारत खूप आवडतो. सोशल मीडियावर जेव्हा तिने टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीला लग्नासाठी प्रपोज केले तेव्हा डॅनियली प्रथम प्रकाशझोतात आली. त्यानंतर भारतात तिची फॅन फॉलोईंग वाढत गेली