होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 5


भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी (MS Dhoni) आयपीएल 2021च्या (IPL2021) तयारीत गुंतला आहे. बुधवारी (तीन मार्च) धोनी चेन्नईच्या विमानतळावरून बाहेर पडताना दिसला. आयपीएल स्पर्धेच्या अनुषंगाने चेन्नई सुपर किंग्ज संघ तयारीसाठी पुढच्या आठवड्यात आपला कँप आयोजित करू शकतो. (फोटो क्रेडिट : चेन्नई सुपर किंग्ज ट्विटर हँडल)
2/ 5


चेन्नई सुपर किंग्ज संघाच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरूनही धोनीचा फोटो शेअर करून त्याचं आयपीएलच्या नव्या हंगामासाठी स्वागत करण्यात आलं.
3/ 5


अंबाती रायडू (Ambati Raidu) सगळ्यात आधी चेन्नईला पोहोचला आहे. रायडू आणि धोनीव्यतिरिक्त आणखी काही स्टार खेळाडूही चेन्नईत (Chennai) दिसू शकतात.
4/ 5


मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात चेन्नई सुपर किंग्ज संघाचा प्रशिक्षण कँप (Training Camp) सुरू होऊ शकतो. त्यात धोनी संघाचं नेतृत्व करू शकतो.