महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षेचा स्वॅग, चांदीच्या गदेनंतर आता मिळाली थार
पुणे येथे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्र केसरी स्पर्धा पारपडली. या स्पर्धेत शिवराज राक्षे याने महेंद्र गायकवाड याला धुळचारत चांदीची मानाची गदा पटकावली. यानंतर त्याला आज बक्षीस म्हणून जाहीर करण्यात आलेली महिंद्रा थार ही गाडी सुपूर्द करण्यात आली.
महाराष्ट्रातील कुस्तीपटूनसाठी अत्यंत प्रतिष्ठेची समजली जाणारी 'महाराष्ट्र केसरी' स्पर्धा 14 जानेवारी रोजी पारपडली.
2/ 6
स्पर्धेच्या अंतिम सामन्यात नांदेडच्या शिवराज राक्षेने सोलापूरच्या महेंद्र गायकवाड अवघ्या काही मिनिटांत मात देऊन महाराष्ट्र केसरी ची मानाची गदा पटकावण्याचा मान मिळवला.
3/ 6
यंदा ही 65 महाराष्ट्र केसरी ही स्पर्धा पुण्यात पारपडली. यात तब्बल 900 हुन अधिक पैलवानांनी स्पर्धेत सहभाग घेतला.
4/ 6
महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या विजेत्या स्पर्धकाला चांदीची मनाची गदा, महिंद्रा थार आणि पाच लाखांचे रोख बक्षीस देण्यात आले.
5/ 6
तर उपविजेत्या महेंद्र गायकवाडला ट्रक्टर आणि रोख अडीच लाख रुपये देवून सन्मानित करण्यात आले.
6/ 6
महाराष्ट्र केसरीचा विजेता ठरलेल्या शिवराज राक्षेला संस्कृती प्रतिष्ठानचेवतीने संस्थापक अध्यक्ष मुरलीधर मोहोळ यांच्या हस्ते महिंद्रा थार गाडी सुपूर्द करण्यात आली.