

न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाने टीमच्या नव्या प्रशिक्षकाची घोषणा केली आहे. माजी विकेट कीपर बॅट्समन ल्यूक रॉन्की (Luke Ronchi)याची बॅटिंग प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. वेस्ट इंडिजची टीम न्यूझीलंडच्या दौऱ्यावर येणार आहे, तेव्हापासून रॉन्कीचा कार्यकाळ सुरू होणार आहे. ल्यूक रॉन्कीचा जन्म न्यूझीलंडमध्ये झाला, पण त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटची सुरूवात ऑस्ट्रेलियाकडून केली होती. ऑस्ट्रेलियाकडून रॉन्कीने 2008 साली 4 वनडे आणि 3 टी-20 आंतरराष्ट्रीय मॅच खेळल्या होत्या


रॉन्की यानंतर न्यूझीलंडला परतला आणि त्याने 2013 ते 2017 या कालावधीमध्ये 4 टेस्ट, 81 वनडे आणि 30 टी-20 मॅच खेळल्या. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली.


रॉन्की मागच्यावर्षी इंग्लंडमध्ये खेळवण्यात आलेल्या वर्ल्ड कपमध्ये न्यूझीलंड टीमच्या कोचिंग स्टाफमध्ये होता. बुधवारी त्याला पूर्णपणे बॅटिंग प्रशिक्षकाची जबाबदारी देण्यात आली. पीटर फल्टनच्याऐवजी ल्यूक रॉन्कीची निवड करण्यात आली आहे.