लोकसभा निवडणुकीच्या सहाव्या टप्प्यातील 59 जागांसाठी सात राज्यात मतदान होत आहे. बिहार, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, हरियाणा, झारखंड, उत्तर प्रदेश आणि दिल्लीत मतदान सुरू आहे.
2/ 6
सकाळपासून मतदानासाठी मतदान केंद्रावर रांगा लागल्या आहेत. यात दिग्गजांनीसुद्धा मतदान केलं.
3/ 6
भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीने गुरुग्राम इथं मतदान केलं.
4/ 6
विराट कोहलीने रांगेत उभा राहून मतदान केलं. यावेळी लोकांनी त्याच्यासोबत सेल्फीही काढला.
5/ 6
क्रिकेटच्या मैदानातून राजकारणाच्या मैदानात उतरलेल्या गौतम गंभीरने मतदाने केले.
6/ 6
माजी क्रिकेटपटू आणि पूर्व दिल्लीतील भाजपचा उमेदवार गौतम गंभीर त्याच्या पत्नीसोबत मतदानासाठी पोहोचला.