पहिल्याच मॅचमध्ये विराटची विकेट, आता हॅट्रिक, IPLमध्ये पैशांचा पाऊस पाडणार?
टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करणारा न्यूझीलंडचा फास्ट बॉलर कायल जेमिसन (Kyle Jamieson)कडे पुढचा स्टार खेळाडू म्हणून बघितलं जात आहे. जेमिसन हा न्यूझीलंड क्रिकेटचं भविष्य असल्याचं बोललं जात आहे.
|
1/ 5
टीम इंडियाविरुद्ध पदार्पण करणारा न्यूझीलंडचा फास्ट बॉलर कायल जेमिसन (Kyle Jamieson)कडे पुढचा स्टार खेळाडू म्हणून बघितलं जात आहे. जेमिसन हा न्यूझीलंड क्रिकेटचं भविष्य असल्याचं बोललं जात आहे.
2/ 5
ऑलराऊंडर असलेल्या जेमिसनने भारताविरुद्ध टेस्ट आणि वनडे सीरिजमध्ये शानदार कामगिरी केली होती. आपल्या पहिल्याच टेस्टमध्ये त्याने विराट कोहलीची विकेट घेतली होती, आता या खेळाडूने आणखी एक रेकॉर्ड केलं आहे.
3/ 5
कायल जेमिसनने प्लंकेट शिल्डमध्ये झालेल्या मॅचमध्ये हॅट्रिक घेतली आहे. जेमिसनने या मॅचमध्ये एकूण 5 विकेट घेतल्या. हॅट्रिकमध्ये त्याने टॉम ब्रुस, डेन क्लिवर आणि ब्रॅड श्कमुलियनची विकेट घेतली.
4/ 5
6 फूट 8 इंच लांब असलेल्या कायल जेमिसनने या मोसमात उत्कृष्ट कामगिरी केली आहे. ओटागोविरुद्ध जेमिसनने 8 विकेट घेतल्या होत्या. भारताविरुद्ध पदार्पण जेमिसनने क्राईस्टचर्च टेस्टमध्ये 5 विकेट घेतल्या होत्या.
5/ 5
काईल जेमिसन बॉलिंगसोबतच चांगली बॅटिंगही करतो आणि लांब सिक्सही मारतो. आयपीएलच्या या मोसमात जेमिसन खेळला नाही, पण पुढच्या वर्षी या ऑलराऊंडरवर पैशांचा वर्षाव होऊ शकतो.