भारताचा 'हा' स्टार युवा फलंदाज अडकला लग्नबंधनात! सोशल मीडियावर शेअर केले खास PHOTO
भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलनं शनिवारी साखरपूडा केला, त्यानंतर आणखी एक युवा फलंदाज लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे.
|
1/ 6
भारतीय क्रिकेट संघाचे खेळाडू सध्या कोरोनामुळे आपल्या घरीच आहेत. दुसरीकडे भारताचा फिरकीपटू युझवेंद्र चहलनं शनिवारी साखरपूडा केला, त्यानंतर आणखी एक युवा फलंदाज लग्नबंधनात अडकल्याचे समोर आले आहे.
2/ 6
युवा क्रिकेटपटू केएस भरतनं कोरोनाच्या संकटात लग्न केले आहे. मोजके मित्र आणि कुटुंबासमवेत केएस भारत विवाहबंधनात अडकला.
3/ 6
आंध्र प्रदेशचा फलंदाज के भरतनं सोशल मीडियावर फोटो शेअर करत लग्नबंधनात अडकल्याची माहिती दिली. भरतनं 10 वर्ष रिलेशनशिपमध्ये असलेल्या अंजलीसोबत 5 ऑगस्ट रोजी लग्न केले.
4/ 6
विशाखापट्टणममध्ये एका सोहळ्यात या दोघांनी पूर्ण रीती रिवाजांनी लग्न केले. लग्नाचे फोटो अपलोड करताना त्याने कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, आम्हाला प्रेम मिळालं आणि आता आम्ही पुढच्या प्रवासासाठी सज्ज आहोत.
5/ 6
जानेवारी 2020मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय एकदिवसीय संघात ऋषभ पंतच्या जागी केएस भरतला संघात स्थान मिळाले. मात्र भरतने आतापर्यंत भारतीय संघासाठी एकही सामना खेळलेला नाही.
6/ 6
2015 मध्ये, भरत रणजी क्रिकेटमध्ये तिहेरी शतक झळकावणारा पहिला विकेटकीपर फलंदाज ठरला. त्या डावात 311 चेंडूंचा सामना करत त्याने 38 चौकार आणि सहा षटकारांच्या मदतीने 308 धावा केल्या.