होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
IPL 2020 : आयपीएल इतिहासात पहिल्यांदाच... फक्त 4 बॉलमध्येच कृणाल पांड्याचा विक्रम
कृणाल पांड्या (Krunal Pandya) ने सनरायजर्स हैदराबाद (Sun risers Hyderabad)विरुद्ध खेळताना फक्त 4 बॉल खेळून विक्रम केला आहे. आयपीएल (IPL 2020) इतिहासात कोणत्याही खेळाडूला असा रेकॉर्ड करता आलेला नाही.
1/ 4


आयपीएल (IPL 2020)च्या प्रत्येक मॅचमध्ये नवा विक्रम होताना दिसत आहे. मुंबई इंडियन्स (Mumbai Indians)चा ऑलराऊंडर कृणाल पांड्या (Krunal Pandya)ने देखील सनरायजर्स हैदराबाद (Sunrisers Hyderabad)विरुद्धच्या मॅचमध्ये नवा विक्रम केला आहे, तोही फक्त 4 बॉल खेळून.
2/ 4


कृणाल पांड्याने हैदराबादविरुद्ध 4 बॉलमध्ये नाबाद 20 रन केले. त्याचा स्ट्राईक रेट 500 होता. आयपीएल इतिहासात 500 च्या स्ट्राईक रेटने कोणत्याच बॅट्समनने बॅटिंग केलेली नाही.
3/ 4


कृणाल पांड्याच्या आधी ऑलराऊंडर क्रिस मॉरिसने 422.22 च्या स्ट्राईक रेटने 9 बॉलमध्ये 38 रनची खेळी केली होती. दुसरीकडे जागतिक क्रिकेटमध्ये दोनच बॅट्समननी 4 बॉलवर 20 पेक्षा जास्त रन केले आहेत. कृणाल पांड्याच्याआधी डेव्हिड वॉर्नरने 4 बॉलमध्ये 22 रन केले होते.