Home » photogallery » sport » KNOW EVERYTHING ABOUT KOBE BRYANT WHO DIED IN HELICOPTER ACCIDENT HIS NET WORTH WAS 5 THOUSAND CRORE MHPG
जगातल्या सर्वात श्रीमंत खेळाडूचा करुण अंत! कोबी ब्रायंटने 20 वर्षांच्या करिअरमध्ये केली रेकॉर्डब्रेक कमाई
जगातील दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट आपल्या करिअरमध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा खेळाडू ठरला. त्याची कमाई मोजणेही लोकांना कठिण झाले होते.
|
1/ 8
जगातील दिग्गज बास्केटबॉलपटू कोबी ब्रायंट यांचे हेलिकॉप्टर अपघातात निधन झाले.
2/ 8
ब्रायंटसोबत झालेल्या या अपघातात त्याची 13 वर्षीय मुलगी गियाना हिचाही मृत्यू झाला.
3/ 8
कोबी ब्रायंट हा जगातील एक महान बास्केटबॉल खेळाडू होता. त्यानं विक्रमी कमाईसह बास्केटबॉलमधून निवृत्ती जाहीर केली होती.
4/ 8
निवृत्तीनंतर कोबी ब्रायंटने आपल्या व्यवसायाला सुरुवात केली. पण त्याआधी त्याने एनबीएमध्ये 20 वर्षांच्या बास्केटबॉल कारकिर्दीत 5 हजार कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.
5/ 8
फोर्ब्सच्या अहवालानुसार, बॉस्केटबॉल खेळण्यासाठी कोबीला 2 हजार 200 कोटी रुपये पगार मिळायचा. त्याचबरोबर त्याने आपल्या कारकीर्दीत जाहिरातींमधून 2 हजार 500 कोटी कमावले.
6/ 8
पाचवेळा एनबीए चॅम्पियन ब्रायंटला इटालियन कारचीही आवड होती.
7/ 8
कोबी ब्रायंटने आपल्या 20 वर्षांच्या कारकीर्दीत अनेक विक्रम केले. कोबी ब्रायंटने नॅशनल बास्केटबॉल असोसिएशनकडून खेळताना 5 स्पर्धाही जिंकल्या.
8/ 8
कोबी त्याच्या करिअरमध्ये 18 वेळा 'एनबीए ऑल स्टार' ठरला. तर, 2016मध्ये तिसऱ्या सर्वात मोठ्या ऑल स्टार खेळाडूनं निवृत्ती जाहीर केली.