IPL 2022 मध्ये पहिल्यांदाच उतरणाऱ्या लखनौच्या संघाने आपली तयारी जोरात सुरू केली आहे. लखनौ फ्रँचायझीने अँडी फ्लॉवर यांची संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. त्याचबरोबर माजी भारतीय क्रिकेटपटू गौतम गंभीरला मेंटर करण्यात आले आहे. आता केएल राहुल संघाचा कर्णधार होऊ शकतो, अशी माहिती समोर येत आहे. राहुल गेल्या मोसमात पंजाब किंग्जचा कर्णधार होता. मात्र आता यावेळी तो पंजाबकडून खेळणार नाहीये.