IPL 2022 : आयपीएलमध्ये 7व्यांदा 700 चा आकडा पार, Jos Buttler ला इतिहास घडवण्याची संधी!
IPL 2022 राजस्थान रॉयल्सचा (Rajasthan Royals) ओपनर जॉस बटलरची (Jos Buttler) बॅट आयपीएलच्या यंदाच्या मोसमात चांगलीच तळपली आहे. या आयपीएलमध्ये बटलरने 700 पेक्षा जास्त रन केल्या आहेत, आता त्याला गेल, विलियमसन आणि हसी यांचा विक्रम मोडण्याची संधी आहे.
|
1/ 6
आयपीएल 2022 राजस्थान रॉयल्सचा ओपनर जॉस बटलरने गाजवलं आहे. आयपीएलच्या या 15व्या मोसमात बटलरने 700 रनचा आकडा पार केला आहे. बटलरच्या या कामगिरीमुळे राजस्थान प्ले-ऑफमध्ये पोहोचली. (Jos Buttler Instagram)
2/ 6
जॉस बटलरने राजस्थान रॉयल्ससाठी या मोसमात आतापर्यंत सगळ्या 14 मॅच खेळल्या, यात त्याने 51.28 च्या सरासरीने आणि 148 पेक्षा जास्तच्या स्ट्राईक रेटने रन केले आहेत. बटलरने या सिझनमध्ये 718 रन केले आहेत. यात 68 फोर आणि 39 सिक्सचा समावेश आहे. (PTI)
3/ 6
आयपीएल इतिहासात फक्त 7 वेळा एखाद्या खेळाडूला 700 रनचा टप्पा पार करता आला आहे. (PTI)
4/ 6
विराट कोहली (973), डेव्हिड वॉर्नर (848), केन विलियमसन (735), क्रिस गेल (733 आणि 708), माइक हसी (733), जोस बटलर (718*) या खेळाडूंनाच आयपीएलच्या एका मोसमात 700 पेक्षा जास्त रन करता आले आहेत. (AFP)
5/ 6
राजस्थान रॉयल्सला या मोसमात अजून जास्तीत जास्त दोन आणि कमीत कमी एक मॅच खेळण्याची संधी आहे, त्यामुळे बटलर 800 रनचा टप्पाही पार करू शकतो. (PIC/Instagram)
6/ 6
जॉस बटलर क्वालिफायर-2 च्या सामन्यात 18 रन करू शकला तर तो क्रिस गेल, केन विलियमसन आणि माईक हसीलाही मागे टाकेल. (PTI)