इंग्लंडचा कसोटी कर्णधार जो रूटला इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्डाकडून (ECB) वार्षिक 7.22 कोटी रुपये मिळतात, जे विराट कोहलीला मिळणाऱ्या 7 कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे. मात्र जगातील सर्वात महागडा कसोटी कर्णधार असलेला रूट इंग्लंडला यश मिळवून देण्यात अपयशी ठरला आहे. या वर्षी भारताने इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर दोन कसोटी सामन्यांमध्ये पराभूत केलं होतं.
जो रूट मात्र फलंदाज म्हणून सर्वाधिक यशस्वी ठरला आहे. रूटने यावर्षी 15 कसोटी सामन्यांच्या 29 डावांमध्ये 61 च्या सरासरीने 1708 धावा केल्या. त्याने 6 शतकं आणि 4 अर्धशतकं केली आहेत. हा विश्वविक्रम पाकिस्तानच्या मोहम्मद युसूफच्या नावावर आहे ज्याने 2006 मध्ये 11 सामन्यात 1788 धावा केल्या होत्या. त्याच्यापाठोपाठ वेस्ट इंडिजचा धडाकेबाज फलंदाज विव्ह रिचर्ड्सचा क्रमांक लागतो, ज्याने 1976 मध्ये 11 कसोटी सामन्यांमध्ये 1710 धावा केल्या होत्या.