टीम इंडियातून बराच काळ खेळलेल्या फास्ट बॉलरला आता कोणत्याही टीमच्या प्लेयिंग इलेव्हनमध्ये संधी मिळणंही मुश्कील झालं आहे. दुखापत आणि खराब फॉर्ममुळे इशांत शर्मा टीम इंडियाच्या तीनही फॉरमॅटमधून बाहेर झाला. आता बीसीसीआयने जाहीर केलेल्या करारबद्ध खेळाडूंच्या यादीतही इशांतचा समावेश नाही. यानंतर इशांतला आयपीएलकडून अपेक्षा होत्या.