कोण आहे अनुपमा परमेश्वरन? जसप्रीत बुमराहबरोबर हिचं नाव चर्चेत
Jasprit Bumrah Marriage : आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
|
1/ 21
भारतीय क्रिकेटपटू जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) भारत-इंग्लंडविरुद्धच्या चौथ्या टेस्ट मॅचमध्ये खेळणार नाही.
2/ 21
बुमराहने वैयक्तिक कारण सांगत चौथ्या टेस्टमध्ये न खेळण्याचं सांगितलं.
3/ 21
बुमराहसोबतच साउथ इंडियन अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननेही (Anupama Parameswaran) सुट्टी घेतली आहे.
4/ 21
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, बुमराहने आपल्या लग्नाच्या तयारीसाठी सुट्टी घेतली आहे.
5/ 21
या आठवड्यात तो विवाहबद्ध होणार असल्याची चर्चा आहे.
6/ 21
दोघांनी एकत्र सुट्टी घेतल्यानंतर सोशल मीडियावर या दोघांची मोठी चर्चा आहे.
7/ 21
काही महिन्यांपूर्वी बुमराह आणि अनुपमा डेट करत असल्याच्या चर्चा होत्या.
8/ 21
यापूर्वी दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे.
9/ 21
दक्षिणात्य चित्रपटातील प्रसिद्ध अभिनेत्री अनुपमा परमेश्वरननेही (Anupama Parmeswaran On leave) आपल्या चित्रीकरणातून सुट्टी घेतली आहे.
10/ 21
25 वर्षीय अनुपमाने तेलुगू आणि मल्याळम चित्रपटात काम केलं आहे.
11/ 21
'मी लग्न करत असल्याने लग्नाच्या तयारीसाठी मला सुट्टी हवी आहे,' असं जसप्रीत बुमराहने बीसीसीआयला सांगितल्याची माहिती आहे.
12/ 21
परंतु लग्न नेमकं कोणासोबत होणार, याबाबत कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.
13/ 21
बॉलिवूड सेलिब्रेटींप्रमाणेच क्रिकेटर्सचा विवाहसोहळा हा नेहमीच चर्चेचा विषय असतो.
14/ 21
आपल्या घातक यॉर्कर्सने जगभरातील दिग्गज फलंदाजांची विकेट घेणाऱ्या बुमराहची विकेट नेमकी कोणी घेतली, याबाबत त्याच्या चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे.
15/ 21
जसप्रीत बुमराह आणि अनुपमा दोघं विवाहबंधनात (bumrah Anupama Parmeswaran Marriage) अडकणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
16/ 21
भारताचा वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jasprit Bumrah) हा त्याच्या दमदार कामगिरीसाठी नेहमीच चर्चेत असतो.
17/ 21
मात्र सध्या बुमराह त्याच्या लग्नाच्या बातमीने चर्चेत आला आहे.
18/ 21
अद्याप बुमराने अधिकृतपणे आपल्या लग्नाविषयी कोणतीही माहिती दिलेली नाही.
19/ 21
अनुपमानेही कुठेही तिच्या लग्नाबाबत माहिती दिलेली नाही.
20/ 21
मात्र दोघांच्या डेटिंगच्या चर्चा आणि आता दोघांनी एकत्र सुट्टी घेतल्याने बुमराह आणि अनुपमा लग्नबंधनात अडकणार असल्याचं बोललं जात आहे.
21/ 21
या चर्चांदरम्यान आता नेमकं काय होतं हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे. (सर्व फोटो सौजन्य : anupamaparameswaran96)