कर्नाटकमध्ये सध्या हिजाबवरून सुरू असलेल्या वादाची (Karnataka hijab controversy) देशभरात चर्चा आहे. त्यातच भारताचा माजी क्रिकेटपटू इरफान पठाण (Irfan Pathan) याने याबाबत एक ट्वीट केलं आहे. निवडणुका आल्या आहेत का? असा प्रश्न इरफान पठाणने ट्विटरवर विचारला आहे. इरफानचा हा प्रश्न म्हणजे त्याने अप्रत्यक्षरित्या हिजाब वादावर टीका केल्याचं बोललं जातंय.
इरफानच्या पत्नीचा चेहरा ब्लर केलेला फोटो शेयर केल्यानंतरही मोठा वाद झाला होता. हा फोटो माझ्या राणीने (पत्नी) मुलाच्या अकाऊंटवरुन पोस्ट केला आहे. या फोटोवरुन आम्हाला अनेकांचा द्वेष सहन करावा लागत आहे. माझ्या पत्नीने तिच्या मर्जीने स्वत:चा चेहरा ब्लर केला आहे. मी तिचा मालक नाही तर जोडीदार आहे,' असं इरफान म्हणाला होता.