भारताच्या युवा क्रिकेटपटूंना घडवण्यासाठी राहुल द्रविड (Rahul Dravid) कठोर मेहनत घेत असल्याचं क्रिकेट चाहत्यांना माहिती आहे, पण द्रविड एनसीएमध्ये (NCA) भारतासाठी प्रशिक्षकही घडवत आहे. मागच्या वर्षी क्रिकेटमधून निवृत्त झालेला इरफान पठाण कोचिंग क्षेत्रात पदार्पण करण्यासाठी तयार आहे. पठाणने एनसीएमध्ये बीसीसीआयकडू आयोजित करण्यात आलेला 8 दिवसांचा लेव्हल हायब्रिड कोचेस कोर्स पूर्ण केला. (Irfan Pathan Instagram)