

भारताचा माजी क्रिकेटपटू युसूफ पठाण त्याचा 38 वा वाढदिवस साजरा करत आहे. वाढदिवसाच्या दिवशी युसूफचा भाऊ आणि भारताचा माजी ऑलराऊंडर इरफान पठाणने युसूफसोबतचा एक जुना फोटो शेयर केला आहे. हा फोटो दोन्ही भावांच्या लहानपणचा आहे. ( Photo- Irfan Pathan Instagram)


या फोटोमध्ये इरफान पठाणचं फुलांचा हार घालून सत्कार होत आहे, तर मागे युसूफ पठाण उभा असल्याचं दिसत आहे. इरफानने आठवणींच्या पेटाऱ्यातून हा फोटो शोधून काढला आणि सोशल मीडियावर शेयर केला. (Photo- Irfan Pathan Twitter)


'ही त्यावेळची गोष्ट आहे, जेव्हा आम्ही लुकडे होतो आणि आम्हाला मिशाही नव्हत्या, लव्ह यू लाला', असं कॅप्शन इरफानने या फोटोला दिलं आहे.


इरफान पठाणने युसूफच्या खूप आधी 2003 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. सुरुवातीच्या काळात इरफानने त्याच्या स्विंगने बॅट्समनची भंबेरी उडवून दिली होती. 2003 साली ऑस्ट्रेलियाविरुद्ध इरफानने पहिली टेस्ट मॅच खेळली होती. (Photo- Irfan Pathan Twitter)