

आयपीएलमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजामध्ये आशिष नेहरा दहाव्या स्थानावर आहे. मुंबई, दिल्ली, चेन्नई, पुणे संघाकडून खेळलेल्या नेहराने 87 सामन्यांमध्ये 2 हजार 460 धावा देत 105 गडी बाद केले आहेत. दहा धावात 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


भारताचा फिरकीपटू आर अश्विनने सीएसके, पुणे सुपरनाईट आणि किंग्ज इनेवन पंजाबकडून खेळताना 2 हजार 910 धावा देत 110 विकेट घेतल्या आहेत. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये तो नवव्य़ा स्थानावर आहे. 34 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


आरसीबी, दिल्ली, केकेआर कडून खेळलेल्या उमेश यादवने 108 सामन्यात 111 विकेट घेतल्या आहेत. IPLमध्ये सर्वाधिक बळी घेणाऱ्यांच्या यादीत तो आठव्या स्थानावर आहे. त्याने 24 धावात 4 बळी घेत स्वत:ची सर्वोत्तम कामगिरी केली. एका सामन्यात 4 विकेट घेण्याची कामगिरी त्याने दोन वेळा केली आहे.


श्रीलंकन गोलंदाज सुनिल नारायण हा आयपीएलमध्ये केकेआरकडून खेळतो. त्याने 98 सामन्यात 2 हजार 498 धावा देत 112 विकेट घेतल्या आहेत. 19 धावात 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी असून एकाच सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक बळी घेण्याची कामगिरी त्याने 5 वेळा केली आहे.


भुवनेश्वर कुमारने सनरायझर्स हैदराबाद, आरसीबी आणि पुणे वॉरिअर्सकडून खेळताना 102 सामन्यात 2 हजार 693 धावा देत 120 विकेट घेतल्या आहेत. 19 धावात 5 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे. एका सामन्यात 4 किंवा त्यापेक्षा अधिक विकेट घेण्याची कामगिरी त्याने 3 वेळा केली आहे. भुवनेश्वर आयपीएलमध्ये सर्वात जास्त विकेट घेणाऱ्यांच्या यादीत सहाव्या क्रमांकावर आहे.


भारताचा फिरकीपटू हरभजन सिंग ने मुंबई इंडियन्स आणि सीएसकेकडून खेळताना 145 सामन्यात गोलंदाजी केली. यात त्याने 3 हजार 641 धावा देताना 134 विकेट घेतल्या. 18 धावात 5 बळी ही त्याची सर्वोत्तम कामगिरी राहिली आहे.


ड्वेन ब्रॅव्होने सीएसके आणि मुंबई इंडियन्सकडून खेळताना 118 सामन्यात 3 हजार 251 धावा देत 136 विकेट घेतल्या. IPL मध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या गोलंदाजांमध्ये ब्रॅव्हो चौथ्या क्रमांकावर आहे. 22 धावात 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


केकेआर आणि किंग्ज इलेवन पंजाब कडून खेळलेल्या फिरकीपटू पियुष चावलाने 143 सामन्यात 140 विकेच घेतल्या आहेत. 17 धावांत 4 विकेट ही त्याची सर्वोत्तम कामगिरी आहे.


दिल्ली, डेक्कन चार्जर्स हैदराबादकडून खेळलेल्या अमित मिश्राने 136 सामन्यात 146 विकेट घेतल्या आहेत. तो आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट घेणाऱ्या खेळाडुंच्या यादीत तो दुसऱ्या स्थानावर आहे.