

आयपीएल 2020च्या (IPL 2020) तेराव्या हंगामात आज दिल्ली कॅपिटल्स आणि सनरायजर्स हैदराबाद (Delhi Capitals vs Sunrisers Hyderabad)यांच्यात दुसरा क्वालिफायर सामना होणार आहे. जो संघ आजचा सामना जिंकेल तो फायनलमध्ये प्रवेश करेल.


दिल्लीच्या संघाला क्वालिफायर-1 सामन्यात मुंबई इंडियन्सकडून लाजीरवाणा पराभव सहन करावा लागला होता. तर SRHनं RCBला नमवत क्वालिफायरमध्ये प्रवेश केला. त्यामुळे दिल्लीसमोर हैदराबादचं कडवे आव्हान असणार आहे. मात्र दिल्लीसमोर सर्वात मोठं आव्हान हैदराबादच्या एका गोलंदाजाचं असणार आहे.


मुंबई इंडियन्सच्या गोलंदाजांसमोर दिल्लीचे फलंदाज तग धरू शकले नाहीत. त्यामुळे दिल्लीसमोत सर्वात मोठं आव्हान असणार आहे ते राशिद खानचे.


हैदराबादचा लेग स्पिनर राशिद खाननं दिल्लीविरुद्ध लीग स्टेजमध्ये झालेल्या दोन्ही सामन्यात जबरदस्त कामगिरी केली होती. दोन्ही सामन्यात राशिद खानमुळे हैदराबादचा विजय झाला.


दिल्लीविरुद्ध झालेल्या दोन सामन्यात राशिदनं एकूण 6 विकेट घेतल्या होत्या. दोन्ही सामन्यात सर्वात कमी धावा देणारा राशिद खान गोलंदा ठरला होता. या हंगामात राशिदनं दिल्लीविरुद्ध केवळ 21 धावा दिल्या आहेत.