महिला आयपीएलमध्ये (IPL) मला चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळायला आवडेल, असं केट क्रॉस (Kate Cross) म्हणाली आहे, याचं कारणंही तिने एमएस धोनी (MS Dhoni) असल्याचं सांगितलं आहे.
भारतीय महिला टीमविरुद्ध 3 मॅचच्या वनडे सीरिजमध्ये धमाकेदार कामगिरी करणारी इंग्लंडची क्रिकेटपटू केट क्रॉसला महिला आयपीएलमध्ये (IPL) चेन्नई सुपरकिंग्सकडून (CSK) खेळायचं आहे. (PC: kate cross instagram)
2/ 8
भारताविरुद्ध जून महिन्यात झालेल्या वनडे सीरिजमध्ये केट क्रॉसने 7 विकेट घेतल्या होत्या. सीरिजच्या दुसऱ्या मॅचमध्ये तिला 5 विकेट मिळाल्या होत्या. (PC: kate cross/ chennai ipl instagram)
3/ 8
2013 साली आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पाऊल ठेवणाऱ्या केटने इंग्लंडकडून 4 टेस्ट, 31 वनडे आणि 13 टी-20 मॅच खेळल्या आहेत. यात तिच्या नावावर 15 टेस्ट विकेट, 42 वनडे आणि 11 टी-20 विकेट आहेत. (PC: kate crossinstagram)
4/ 8
चेन्नई सुपरकिंग्सबद्दलचं केटचं प्रेम अनेक क्रिकेट रसिकांना माहिती आहे. अनेकवेळा तिने सोशल मीडियावरून चेन्नईबद्दलचं आपलं प्रेम बोलून दाखवलं आहे.
5/ 8
आर. अश्विनच्या युट्यूब चॅनलवर केट आली होती, त्यावेळी तिने चेन्नई सुपरकिंग्सला पाठिंबा देण्याचं आणि टीमवर प्रेम करण्याचं कारण एमएस धोनी आहे, असं सांगितलं. (PC: kate cross/ chennai ipl instagram)
6/ 8
महिला आयपीएलमध्ये मला चेन्नई सुपरकिंग्सकडून खेळायला आवडेल, असं केट म्हणाली. (PC: kate cross/ chennai ipl instagram)
7/ 8
आयपीएल 2021 आधी चेन्नई सुपरकिंग्सने आपल्या या चाहतीला एक जर्सीही पाठवली होती. ही जर्सी घालून केटने एक फोटो सोशल मीडियावर पोस्ट केला होता. (PC: kate cross instagram)
8/ 8
केटचं भारताविरुद्धचं रेकॉर्ड उत्कृष्ट आहे. टेस्टमध्ये पदार्पण केल्यानंतर आपल्या दुसऱ्याच मॅचमध्ये तिने भारताविरुद्ध 6 विकेट घेतल्या होत्या. भारताविरुद्ध 2019 साली झालेल्या 3 टी-20 मॅचमध्ये तिने 4 विकेट घेतल्या होत्या. (PC: kate cross instagram)