IPL 2023 MI vs CSK : रोहित शर्माने नावावर केला नकोसा रेकॉर्ड, दिनेश कार्तिकलाही टाकलं मागे
आयपीएल 2023 मधील 49 व्या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा पुन्हा एकदा फलंदाजीत फ्लॉप ठरला आहे. सलग दुसऱ्या सामन्यात रोहित शून्यावर बाद झाला असून यामुळे त्याने आयपीएलमध्ये स्वतःच्या नावावर नकोसा रेकॉर्ड नोंदवला आहे.
आयपीएल 2023 मध्ये पंजाब किंग्स विरुद्ध खेळवण्यात आलेल्या सामन्यात रोहित शर्मा तीन चेंडू खेळत शुन्य धावा करून बाद झाला होता. यावेळी त्याने आयपीएलमध्ये सर्वाधिक 15 वेळा डक आउट होणाऱ्यांच्या यादीत स्थान मिळवले होते.
2/ 5
मुंबई इंडियन्स विरुद्ध चेन्नई सुपरकिंग्स यांच्या विरुद्ध होणाऱ्या सामन्यात रोहित शर्माची कामगिरी सुधारेल अशी अपेक्षा असताना रोहितने पुन्हा चाहत्यांचा अपेक्षा भंग केला आहे.
3/ 5
मुंबई इंडियन्सची एक विकेट पडल्यावर प्रथम फलंदाजीसाठी आलेला रोहित शर्मा पुन्हा एकदा डक आउटचा शिकार झाला. दीपक चहरने टाकलेल्या बॉलवर रोहित शर्मा लॅप शॉट मारण्याच्या प्रयत्नात कॅच आउट झाला. रवींद्र जडेजाने त्याचा कॅच पकडला.
4/ 5
सलग दुसऱ्यांदा डक आउट झाल्यानंतर रोहित शर्माने हा आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक वेळा डक आउट झालेला खेळाडू ठरला आहे.
5/ 5
रोहित शर्मा तब्बल 16 वेळा डक आउट झाला असून त्याने 15 वेळा डक आउट झालेल्या दिनेश कार्तिक आणि मंदीप सिंह यांनाही मागे टाकले आहे.