IPL 2023 : IPL च्या इतिहासात या संघाच्या खेळाडूंनी घेतल्या सर्वाधिक हॅट्रिक!
क्रिकेट जगतातील सर्वात मोठ्या लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीग ही स्पर्धा भारतात 31 मार्च पासून सुरु होणार आहे. यंदा आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात जाएंट्स यांच्यात रंगणार आहे. दरवर्षी आयपीएलमध्ये अनेक रेकॉर्डस् बनतात आणि मोडले देखील जातात ज्यामुळे ही स्पर्धा दरवर्षी अधिकाधिक रोमांचक होत असते. अशातच आज आयपीएलच्या इतिहासातील सर्वाधिक हॅट्रिक घेणाऱ्या संघांविषयी जाणून घेणार आहोत.
आयपीएलच्या इतिहासात राजस्थान रॉयल्स संघाने सर्वाधिक 5 हॅट्रिक घेतल्या आहेत. हॅट्रिक घेणाऱ्यांमध्ये शेन वॉटसन, प्रवीण तांबे, अजीत चंडीला, श्रेयस गोपाल, युझवेंद्र चहल इत्यादी खेळाडूंचा समावेश आहे.
2/ 6
पंजाब किंग्सचा संघ हॅट्रिक घेण्याच्या बाबतीत दुसऱ्या स्थानावर असून संघाने 4 हॅट्रिक घेतल्या आहेत. यात युवराज सिंहच्या 2 तर सॅम करन आणि अक्षर पटेल यांच्या प्रत्येकी 1 हॅट्रिकचा समावेश आहे.
3/ 6
रॉयल चॅलेंजर्स बँगलोर संघाच्या तीन खेळाडूंनी आतापर्यंत हॅट्रिक घेतली आहे. यात प्रवीण कुमार, हर्षल पटेल, सॅम्युअल बद्री यांचा समावेश आहे.
4/ 6
आयपीएलची पूर्व टीम डेक्कन चार्जस च्या खेळाडूंनी आयपीएलमध्ये दोन हॅट्रिक घेतल्या आहेत. यात रोहित शर्मा, अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक हॅट्रिक घेतली आहे.
5/ 6
चेन्नई सुपरकिंग्स संघाच्या नावावर आयपीएलच्या इतिहासात 2 हॅट्रिक्स आहेत. चेन्नईचे खेळाडू लक्ष्मीपती बालाजी, मखाया अँथनी यांनी प्रत्येकी 1 हॅट्रिक घेतली आहे. यापैकी लक्ष्मीपती बालाजी याची हॅट्रिक आयपीएलच्या इतिहासातील पहिली हॅट्रिक आहे.
6/ 6
सनरायजर्स हैद्राबाद आणि दिल्ली कॅपिटल्स संघासाठी अमित मिश्रा यांनी प्रत्येकी एक एक हॅट्रिक घेतली होती. तर केकेआर संघासाठी सुनील नरेन याने एक हॅट्रिक घेतली होती. तर रायजिंग पुणे सुपरजाएंट्ससाठी जयदेव उनादकट याने 1 हॅट्रिक घेतली होती.