IPL 2023 : होऊ दे खर्च! रश्मिकाचा जलवा अन् तमन्नाची अदा, IPL च्या ओपनिंग सोहळ्याचे PHOTOS
जगप्रसिद्ध क्रिकेट लीगपैकी एक असणारी इंडियन प्रीमियर लीगच्या 16 व्या सीजनला आजपासून सुरुवात झाली आहे. अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियमवर आयपीएलचा पहिला सामना होणार असून यापूर्वी आयपीएलचा उदघाटन सोहळा पारपडला. तब्बल चार वर्षांनी हा दिमाखदार सोहळा पारपडला असून या सोहळ्यात बॉलिवूड स्टार्सने चारचाँद लावले.
आयपीएलचा पहिला सामना चेन्नई सुपरकिंग्स विरुद्ध गुजरात टायटन यांच्यात होणार आहे. या सामन्यापूर्वी आयपीएल 2023 चा उदघाटन सोहोळा पारपडला.
2/ 5
आयपीएलचा पहिला सामना पाहण्यासाठी जगातील सर्वात मोठं नरेंद्र मोदी स्टेडियमवर जवळपास १ लाख प्रेक्षक उपस्थित आहेत. अभिनेत्री आणि सुप्रसिद्ध अँकर मंदिरा बेदी यांनी आयपीएलच्या उद्धाटन सोहोळ्याचे सूत्रसंचालन केले.
3/ 5
उदघाटन सोहोळ्याचे सुरुवात सुप्रसिद्ध गायक अरिजित सिंह याच्या गाण्याने झाली. त्याने हे वतन मेरे वतन , वंदे मातरम, लेहेरा दो, झुमे जो पठाण, केसरीया, डान्स का भूत इत्यादी अनेक गाणी गायली.
4/ 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री रश्मीका मंधाना हिने उदघाटन सोहोळ्यात डान्सचा जलवा दाखवला. यात तिने सामे सामे गाण्यावबर डान्स केला.
5/ 5
बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री तमन्ना भाटिया हिने उदघाटन सोहोळ्यात प्रसिद्ध गाण्यावर नृत्य केले.