शुभमन गिल : भारताचा स्टार युवा फलंदाज शुभमन गिलच्या लुक्सवर अनेक तरुणी फिदा आहेत. काहीजणी तर भर सामन्यात खुलेआमपणे हातात पोस्टर धरून त्याच्या प्रती आपले प्रेम व्यक्त करत असतात. शुभमन गिल आयपीएल 2023 मध्ये गुजरात टायटन संघाकडून खेळताना दिसणार आहे. त्याने आयपीएलमधील कारकिर्दीत 74 सामने खेळले असून 1900 धावा केल्या आहेत.
सॅम करन : इंग्लंडचा युवा खेळाडू सॅम करन हा आयपीएल 2023 मधील सर्वात महागडा खेळाडू आहे. पंजाब किंग्सने त्याला लिलावात 18.5 कोटींची बोली लावून खरेदी केले. सॅमची स्टाईल आणि त्याचा क्युट लुक्सवर अनेक तरुणी फिदा आहेत. त्याने आयपीएल करिअरमध्ये 32 सामने खेळले असून 337 धावा केल्या असून यात त्याने 32 विकेट्स देखील घेतल्या आहेत.
टिम डेव्हिड : ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू टिम डेव्हिड हा देखील त्याच्या लुक्सने तरुणींना घायाळ करतो. टिम डेव्हिड काही दिवसांपूर्वीच मुंबई इंडियन्सच्या कॅम्पमध्ये सामील झाला होता. तेव्हा त्याचा मराठमोळा फेटा घातलेला लुक्स फार व्हायरल झाला. टिम डेव्हिडने आयपीएल कारकिर्दीत 9 सामने खेळले असून यात 187 धावा केल्या आहेत.