IPL 2023 : आयपीएल अर्धवट सोडून दिल्ली कॅपिटल्सच्या खेळाडूने उरकलं लग्न
जगप्रसिद्ध आयपीएल 2023 या स्पर्धेला सुरुवात झाली असून यात दररोज रोमांचक सामने प्रेक्षकांना पाहायला मिळतायत. अशातच दिल्ली कॅपिटल्सच्या स्टार खेळाडूने आयपीएल मध्यातच सोडून आपल्या मायदेशात जाऊन आपल्या गर्लफ्रेंडशी विवाह केला आहे. सध्या या दोघांच्या लग्नाचे रोमँटिक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत असून नेटकरी यावर लाईक्सचा वर्षाव करीत आहेत.
आयपीएल 2023 मध्ये दिल्ली कॅपिटल्सचा भाग असलेला ऑस्ट्रेलियाचा स्फोटक अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्श हा नुकताच विवाहबंधनात अडकला आहे. त्याने सोमवारी गर्लफ्रेंड ग्रेटा मॅकशी लग्न केले.
2/ 5
लग्नासाठी मिचेल मार्श आयपीएल अर्धवट सोडून ऑस्ट्रेलियात परतला होता. केवळ लग्न करण्यासाठी तो आपल्या देशात परतला असून काही दिवसात भारतात परतणार आहे.
3/ 5
मिचेल मार्शची पत्नी ही ‘द फार्म मार्गारेट रिव्हर’ कंपनीची सहसंचालक आहे. बरेच दिवस एकत्र राहिल्यानंतर 11 सप्टेंबर 2021 रोजी या दोघांची एंगेजमेंट झाली होती. आता हे दोघे आपल्या कुटुंबाच्या उपस्थितीत लग्नबंधनात अडकले आहेत.
4/ 5
मार्श लग्नासाठी मायदेशात परतल्याने तो राजस्थान रॉयल्स, मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू यांच्याविरुद्धच्या तीन सामन्यांमधून बाहेर गेला आहे.
5/ 5
मिचेल मार्श याने आपल्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले. मार्श हा ऑल राउंडर प्लेअर असून आतापर्यंत आयपीएल कारकिर्दीत त्याने 31 मॅचमध्ये 480 धावा केल्या आहेत. तसेच गोलंदाजी करताना 25 विकेट्स घेतल्या आहेत.