आयपीएल 2022 साठी 8 टीमनी रिटेन केलेल्या खेळाडूंची यादी जाहीर केली आहे, यामध्ये काही आश्चर्यकारक नावंही आहेत. या खेळाडूंना मोठी रक्कम देऊन टीमनी त्यांच्यासोबत कायम ठेवलं आहे. यातलं सगळ्यात मोठं नाव व्यंकटेश अय्यरचं (Venkatesh Iyer) आहे. मागच्या महिन्यात अय्यरने न्यूझीलंडविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केलं होतं. त्याआधी तो आयपीएल 2021 मध्ये केकेआरकडून (KKR)खेळला होता. आयपीएलच्या एका मोसमाचा अनुभव असूनही केकेआरने अय्यरला 20 लाखांवरून थेट 8 कोटी रुपयांना रिटेन केलं. अय्यरच्या पगारात 40 पट वाढ झाली आहे.
अब्दुल समद : सनरायजर्स हैदराबादने (SRH) 20 वर्षांचा जम्मू-काश्मीरचा ऑलराऊंडर अब्दुल समदला आयपीएल 2020 साली त्याची बेस प्राईज 20 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं. आयपीएल 2022 साली मात्र समदचं नशीब चमकलं. हैदराबादने त्याला 20 पट जास्त पैसे देऊन 4 कोटी रुपयांना रिटेन केलं. समदने आयपीएल 2021 मध्ये 7 मॅच खेळून 75 रन केले आणि एक विकेट घेतली. आयपीएल 2020 साली समदने 12 सामन्यांमध्ये 111 रन केले होते, तेव्हा त्याने 170 च्या स्ट्राईक रेटने बॅटिंग केली होती. (Abdul Samad Instagram)
अर्शदीप सिंग : पंजाब किंग्सने (Punjab Kings) आयपीएल 2022 साठी फक्त दोन खेळाडूंनाच रिटेन केलं आहे. यामध्ये ओपनर मयंक अग्रवाल आणि अनकॅप खेळाडू अर्शदीप सिंग यांचा समावेश आहे. 20 वर्षांच्या अर्शदीपला पंजाबने 2019 साली 20 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं होतं. आयपीएल 2021 मध्ये अर्शदीपची कामगिरी शानदार झाली. 12 मॅचमध्ये त्याने 18 विकेट घेतल्या. या आयपीएलमध्ये अर्शदीपला प्रत्येक 14 बॉलनंतर विकेट मिळाली, आतापर्यंत 23 सामन्यांमध्ये त्याने 30 विकेट घेतल्या आहेत. (Arshdeep Singh Instagram)
उमरान मलिक : सनरायजर्स हैदराबादने जम्मू-काश्मीरचा फास्ट बॉलर उमरान मलिकला आयपीएल 2022 साठी रिटेन करण्याचा निर्णय घेतला आहे. उमरानने आयपीएल 2021 मधून पदार्पण केलं होतं. हैदराबादने उमरानला 10 लाख रुपयांमध्ये विकत घेतलं होतं, पण आता त्याला 4 कोटी रुपये मिळणार आहेत. उमरान मलिकने आयपीएलमध्ये फक्त 3 मॅच खेळल्या, यात त्याने 2 विकेट मिळवल्या. कमी सामने खेळूनही उमरान मलिकने त्याच्या वेगाने अनेकांना आश्चर्याचा धक्का दिला. उमरानने आयपीएल 2021 मध्ये 152.95 किमी प्रती तास या वेगाने बॉल टाकला. याचसोबत तो आयपीएल इतिहासातला सगळ्यात जलद बॉल टाकणारा भारतीय खेळाडू ठरला. टी-20 वर्ल्ड कपमध्येही उमरान मलिक टीम इंडियासोबत नेट बॉलर होता. (umran malik instagram)
यशस्वी जयस्वाल : 2020 मध्ये झालेल्या अंडर-19 वर्ल्ड कपमध्ये यशस्वी जयस्वालने 6 मॅचमध्ये 400 रन ठोकले होते. यानंतर आयपीएल 2020 आधी राजस्थानने (Rajasthan Royals) त्याला विकत घेतलं. 20 लाखांची बेस प्राईज असलेल्या जयस्वालसाठी राजस्थानने 12 पट जास्त 2 कोटी 40 लाख रुपये दिले. आयपीएल 2022 साठी राजस्थानने जयस्वालला 4 कोटी रुपयांना रिटेन केलं. यशस्वी आयपीएल 2021 मध्ये 10 मॅच खेळला, यात त्याने 249 रन केले, ज्यात एक अर्धशतक होतं. त्याचा स्ट्राईक रेटही 148.21 चा होता, तसंच त्याने 32 फोर आणि 10 सिक्सही लगावले. (Yashasvi Jaiswal Instagram)