आयपीएल 2021 (IPL 2021) च्या दुसऱ्या सत्राला 19 सप्टेंबरपासून युएईमध्ये सुरुवात होणार आहे. त्याआधी रॉयल चॅलेंजर्स बँगलोरच्या टीममध्ये (RCB) मोठे बदल झाले आहेत. बँगलोरच्या टीमने एडम झम्पा, केन रिचर्डसन, फिन एलन यांच्याऐवजी वानेंदु हसारंगा, दुष्मंता चमीरा आणि टीम डेव्हिड यांना टीममध्ये घेतलं आहे. हसारंगा आणि चमीरा यांना भारतीय चाहत्यांनी मागच्याच महिन्यात बघितलं होतं. श्रीलंकेच्या या दोन्ही खेळाडूंनी भारताविरुद्धच्या वनडे आणि टी-20 सीरिजमध्ये शानदार कामगिरी केली होती. पण टीम डेव्हिड भारतात फार परिचित नाव नाही. (Tim David Instagram)
टीम डेव्हिड सध्या इंग्लंडमध्ये सर्रेकडून खेळत आहे. मागच्या आठवड्यात 15 ऑगस्टला त्याने धडाकेबाज शतक केलं होतं. रॉयल लंडन वनडे कपच्या क्वार्टर फायनलमध्ये ग्लूस्टरशरविरुद्ध सर्रेची टीम 243 रनच्या आव्हानाचा पाठलाग करत होती, तेव्हा टीम डेव्हिडने चौथ्या क्रमांकावर येऊन 73 बॉलमध्येच 102 रन केले. आपल्या शतकीय खेळीमध्ये त्याने 11 फोर आणि 5 सिक्स लगावल्या. (Tim David Instagram)