भारताचा महान क्रिकेटपटू एमएस धोनीची (MS Dhoni) गणना जगातल्या सर्वोत्तम कर्णधारांमध्ये होते. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये धोनी 13 व्या मोसमात नेतृत्व करेल. त्याने 12 वेळा चेन्नई सुपरकिंग्सचं तर एकदा रायजिंग पुणे सुपरजायंट्सचं नेतृत्व केलं आहे. धोनीने चेन्नईला तीनवेळा आयपीएल ट्रॉफी जिंकवून दिली आहे. धोनीची ही शेवटची आयपीएल स्पर्धा असेल, असं बोललं जात आहे, त्यामुळे तो यंदा 7 मोठे विक्रम करून क्रिकेटला अलविदा करेल, अशी शक्यता आहे. (CSK/Twitter)