RCB कडून IPL मध्ये हॅट्रिक घेणारा हर्षल पटेल ठरला तिसरा गोलंदाज; पर्पल कॅपच्या रेसमध्ये आहे सर्वात पुढे
IPL 2021 : IPL मध्ये रविवारी रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि मुंबई इंडियन्स (RCB vs MI) यांच्यातील सामन्यात एक विशेष विक्रम झाला आहे. आरसीबीचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलने मुंबईविरूद्धच्या सामन्यात हॅटट्रिक घेतली. पाहा त्याचे काही PHOTOS
त्याच्या आधी आरसीबीच्या 2 गोलंदाजांनी ही कामगिरी केली आहे. यात वेस्ट इंडिजचा सॅम्युअल बद्री आणि भारताचा प्रवीण कुमार यांचा समावेश आहे.
2/ 6
हर्षलच्या आधी सॅम्युअल बद्रीने 14 एप्रिल 2017 रोजी मुंबई इंडियन्सविरुद्ध आरसीबीसाठी हॅटट्रिक घेतली होती. त्या सामन्यात बद्रीने 4 षटकांत 9 धावा देऊन 4 बळी घेतले होते.
3/ 6
आरसीबीसाठी प्रथमच हा पराक्रम प्रवीण कुमारने 18 मार्च 2010 रोजी केला होता. मग त्याने हे यश राजस्थान रॉयल्सविरुद्ध मिळवले. या सामन्यात प्रवीणने 4 षटकांत 18 धावा देऊन 3 बळी घेतले होते.
4/ 6
सामन्यानंतर हर्षल म्हणाला की मी सहाव्यांदा हॅट्रिक केली आहे. परंतु माझ्या IPL करियरमधील ही पहिलीच हॅट्रिक आहे. त्यामुळे मला आनंद झाला आहे.
5/ 6
आरसीबीचा हा वेगवान गोलंदाज या हंगामात पर्पल कॅपच्या शर्यतीत आघाडीवर आहे. हर्षलच्या आता 10 सामन्यांत 23 विकेट्स आहेत. त्याने आयपीएल 2021 मध्ये 4 आणि एकदा 5 विकेट्स घेतल्या आहेत.
6/ 6
फिरकी गोलंदाज अमित मिश्राने IPL च्या इतिहासात आतापर्यंत 3 वेळा हॅटट्रिक घेतली आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद, डेक्कन चार्जर्स आणि दिल्ली डेअरडेव्हिल्स या संघांसाठी खेळताना सलग 3 चेंडूंमध्ये 3 विकेट्स घेतल्या होत्या.