आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये मिळालेल्या पहिल्याच संधीमध्ये महिपाल लोमरोरने (Mahipal Lomror) धमाका केला. राजस्थान रॉयल्सच्या या 21 वर्षांच्या ऑलराऊंडरने 17 बॉलमध्येच 43 रन ठोकले. यामध्ये 4 सिक्स आणि 2 फोरचा समावेश होता. महिपाल लोमरोरची गणना भारताच्या भावी सुपरस्टारमध्ये केली जाते. (Photo- mahipal_lomror)
महिपाल राजस्थानच्या नागौरचा रहिवासी आहे. लहानपणापासूनच त्याचं क्रिकेटपटू व्हायचं स्वप्न होतं. महिपालची आजी सिणगारी देवी यांनी महिपालच्या लहानपणाबाबत काही दिवसांपूर्वी मुलाखत दिली होती. लहानपणी महिपाल क्रिकेट खेळण्यासाठी हट्ट करायला लागला, तेव्हा त्याला मी हातात धोपाटणं दिलं, यानंतर त्याला बॅट आणून दिली. बॅट हातात येताच घरासमोरच्या गल्लीलाच त्याने क्रिकेटचं मैदान बनवलं. आपल्या छोट्या बहिणीला तो बॉलिंग करायला लावायचा आणि स्वत: बॅटिंग करायचा. (Photo- mahipal_lomror)
महिपाल लोमरोरने अगदी लहान वयात घर सोडलं होतं. त्याच्या वडिलांनी त्याला 11 वर्षांचा असताना नागौरवरून जयपूरला पाठवलं. नागौरमध्ये क्रिकेट सुविधा चांगल्या नव्हत्या, त्यामुळे कोचच्या सांगण्यावरून महिपाल जयपूरला आला. त्याच्यासोबत त्याची आजीही जयपूरमध्ये आली आणि आपल्या नातवाचा तिने सांभाळ केला. (Photo- mahipal_lomror)
महिपालला ज्युनियर क्रिस गेल म्हणूनही संबोधलं जातं, कारण तो मोठमोठे सिक्स मारण्यासाठी प्रसिद्ध आहे. तसंच तो डावखुरी स्पिन बॉलिंगही करतो. अंडर 14 वेरॉक शिल्डच्या फायनलमध्ये महिपालने 250 रन केले. यानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू चंद्रकांत पंडित त्याला भारताचा क्रिस गेल म्हणाले. (Photo- mahipal_lomror)
21 वर्षांच्या या खेळाडूने राजस्थानसाठी 33 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 39 पेक्षा जास्तच्या सरासरीने 1,953 रन केले. लिस्ट एमध्येही लोमरोरची सरासरी जवळपास 42 ची आहे. आयपीएलमध्ये लोमरोरला पहिले दिल्लीने विकत घेतलं होतं, पण त्याला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही. यानंतर तो राजस्थान रॉयल्सच्या टीममध्ये गेला. लोमरोरने आयपीएलच्या 8 सामन्यांमध्ये जवळपास 137 च्या स्ट्राईक रेटने 130 रन केले आहेत. (Photo- mahipal_lomror)