मुंबईची टीम दिल्लीला पोहोचणारी पहिलीच टीम आहे. बाकीच्या तीन टीम 26 एप्रिलला दिल्लीला पोहोचतील. मुंबई इंडियन्सनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर टीम दिल्लीत पोहोचल्याचे फोटो पाठवले. या फोटोमध्ये राहुल चहर त्याची होणारी बायको इशानीसोबत दिसला. मुंबई इंडियन्सच्या या इन्स्टाग्राम पोस्टवर एका चाहत्याने केलेली मराठी कमेंट व्हायरल झाली आहे. 'दिल्लीच्या सगळ्या मॅच जिंका आणि फायनलला त्या आरसीबीला फोडा,' अशी कमेंट या चाहत्याने केली आहे.