आयपीएलमुळे (IPL) फक्त बीसीसीआयच (BCCI) नाही तर खेळाडूंना देखील मोठा फायदा झाला आहे. विराट कोहली (Virat Kohli) बीसीसीआयच्या करारामधून 7 कोटी रुपये कमावतो. तर दोन महिन्यांच्या आयपीएलमधून त्याला 17 कोटी रुपये मिळतात. रोहित शर्मा, महेंद्रसिंह धोनी आणि जसप्रीत बुमराह यांची देखील हीच स्थिती आहे. फक्त भारतीय क्रिकेटर्सच नाही तर परदेशी क्रिकेटर्स देखील आयपीएलमधून मोठी कमाई करतात. आता 18 फेब्रुवारीला पुन्हा आयपीएलचा लिलाव होणार आहे, त्यावेळीही खेळाडूंवर मोठी बोली लागेल हे निश्चित.
युवराज सिंह (16 कोटी) आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू युवराजसिंग (Yuvraj Singh) आहे. युवराजला दिल्ली कॅपिटल्सने (delhi capitals) 2015 मध्ये 16 कोटी रुपयांना खरेदी केले होते. रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुद्वारे (royal challengers bangalore) रिलीज करण्यात आल्यानंतर त्याला दिल्ली कॅपिटल्सने खरेदी केलं. मात्र त्या मोसमात युवराज फक्त 248 रन करु शकला आणि त्याला एक विकेट मिळाली. (Photo - Yuvraj Singh/Instagram)
युवराज सिंह (14 कोटी) दिल्ली कॅपिटल्सने खरेदी करण्यापूर्वी 2014 मध्ये युवराज सिंगला रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (royal challengers bangalore) 14 कोटी रुपयांना खरेदी केले होते. पण एका सीझननंतरच त्याला रिलीज करण्यात आले होते. युवराजने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुकडून खेळताना फक्त 376 रन केले होते तर 5 विकेट्स घेतल्या होत्या. (File Photo)
दिनेश कार्तिक (12.5 कोटी) युवराज सिंग व्यतिरिक्त दिनेश कार्तिक हा आयपीएलमध्ये मोठी कमाई करणारा खेळाडू आहे. 2014 च्या लिलावादरम्यान त्याला मोठी रक्कम मिळाली होती. दिल्ली कॅपिटल्सने (delhi capitals) त्याला 12.5 कोटी रुपयांना खरेदी केले होते. 2014 मध्ये कार्तिकने 325 रन केले होते. त्यानंतर त्याला रिलीज करण्यात आले. 2015च्या लिलावा दरम्यान रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने (royal challengers bangalore) त्याला खरेदी केले आणि 2016 मध्ये पुन्हा एकदा तो लिलावासाठी उपलब्ध राहिला. (Photo : KKR Twitter)
जयदेव उनाडकट (11.5 कोटी) राइजिंग पुणे सुपरजाइंट्ससोबत 2017च्या आयपीएलमध्ये शानदार प्रदर्शन केल्यानंतर जयदेव उनाडकट 2018च्या आयपीएल लिलावामध्ये मोठ्या किंमतीत विकला गेला. किंग्स इलेव्हन पंजाब (kings xi punjab) आणि चेन्नई सुपर किंग्सने (Chennai Super Kings) लागोपाठ त्याच्यासाठी बोली लावली होती आणि ही बोली 11.5 कोटी रुपयांवर जाऊन थांबली. जेव्हा असे वाटत होते की किंग्स इलेव्हन पंजाब त्याला खरेदी करेल, पण राजस्थान रॉयल्सने मध्ये उडी मारली. राजस्थानने त्याला 11.5 कोटी रुपयांना खरेदी केले. आयपीएलच्या मागच्या तीन सीझनमध्ये तो राजस्थानसोबतच खेळत आहे. त्याने 25 विकेट घेतल्यात. (Photo : Jaydev Unadkat Instagram)
केएल राहुल (11 कोटी) आयपीएलचा 11वा सीजन मिस केल्यानंतर केएल राहुल पुन्हा या स्पर्धेमध्ये परतला. किंग्स इलेव्हन पंजाबने (kings xi punjab) त्याला 11 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले. राहुलला ऐवढ्या मोठ्या किंमतीत खरेदी केले जाईल असे कोणालाही वाटले नव्हते. राहुलसाठी मुंबई इंडियन्स, राजस्थान रॉयल्स, सनराइज हैदराबाद आणि किंग्स इलेव्हन पंजाब यांनी बोली लावली होती. राहुल 2018 पासून प्रत्येक सीझनमध्ये 500 पेक्षा जास्त रन बनवतो. 2018 मध्ये त्याने 659, 2019 मध्ये 593 आणि 2020 मध्ये त्याने 670 रन बनवले होते. कोरोना महामारीमुळे यूएईमध्ये खेळण्यात आलेल्या आयपीएल 2020मध्ये राहुल पंजाबच्या टीमचा कर्णधार होता. (Photo : KXIP/Twitter)