आरसीबीचा स्कोअर 53/4 असताना आठव्या क्रमांकावर बॅटिंगसाठी तयार असलेला जेमिसन पॅड बांधून बसला होता. कॅमेरामनने कॅमेरा जेव्हा आरसीबीच्या डग आऊटकडे पॅन केला तेव्हा काईल जेमिसन डग आऊटमधल्या मुलीकडे बघत होता. जेमिसन या मुलीकडे बघून हसताना जगाला दिसला. यानंतर जेमिसनचा हा फोटो सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगासारखा पसरला. आरसीबीच्या डग आऊटमध्ये असलेली ही मुलगी टीमची मसाज थेरपिस्ट नवनीता गौतम (Navnita Gautam) आहे.
आरसीबीसोबत असताना मला माझ्या 20 भावांसोबत असल्यासारखं वाटतं. जोपर्यंत खेळाडू आणि सपोर्ट स्टाफ तुमच्या कामावर विश्वास ठेवतात तोपर्यंत तुम्ही महिला आहात का पुरुष आहात, या गोष्टी महत्त्वाच्या ठरत नाहीत, कारण आम्ही वैद्यकीय कर्मचारी आहोत, अशी प्रतिक्रिया नवनीताने दिली. (Photo- Navnita Gautam Instagram)
लीगच्या 31 व्या मॅचमध्ये आरसीबीचा कोलकात्याने (RCB vs KKR) 9 विकेटने पराभव केला. पहिले बॅटिंग करताना आरसीबीला फक्त 92 रन करता आले. विराट (Virat Kohli) आणि एबी डिव्हिलियर्ससारखे (Ab De Villiers) मोठे खेळाडूही अपयशी ठरले. पहिले बॅटिंग करणाऱ्या आरसीबीला फक्त 92 रनच करता आले. या आव्हानाचा पाठलाग केकेआरने 60 बॉल आधीच केला.