होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
IPL 2021 : जयवर्धनेनंतर संगकाराची नवी इनिंग, आयपीएलच्या या टीममध्ये मोठी जबाबदारी
श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकारा (Kumar Sangakara) निवृत्तीनंतर नव्या इनिंगमध्ये दिसणार आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये संगकारावर राजस्थान रॉयल्सच्या टीमने मोठी जबाबदारी सोपावली आहे.
1/ 4


श्रीलंकेचा महान क्रिकेटपटू कुमार संगकारा निवृत्तीनंतर नव्या इनिंगमध्ये दिसणार आहे. आयपीएल 2021 (IPL 2021) मध्ये संगकारावर राजस्थान रॉयल्सच्या टीमने मोठी जबाबदारी सोपावली आहे. संगकाराला राजस्थानने त्यांचा क्रिकेट डायरेक्टर बनवलं आहे. संगकारा सध्या मेरलिबोर्न क्रिकेट क्लब (एमसीसी) चा अध्यक्षदेखील आहे.
2/ 4


संगकारा प्रशिक्षणाचा ढाचा, लिलावाची योजना, टीम रणनीती, प्रतिभावान खेळाडूंना शोधणं आणि त्यांचा विकास करणं ही कामं राजस्थानसाठी करणार आहे. याचसोबत त्याच्यावर नागपूर रॉयल्स अकादमीची जबाबदारीही सोपवण्यात आली आहे.
3/ 4


जगातल्या प्रमुख स्पर्धेत सहभागी होण्यासाठी आणि विकास कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी प्रेरित झालो, अशी प्रतिक्रिया संगकाराने त्याच्या नियुक्तीनंतर दिली आहे.