आयपीएल 2021 चा मोसम (IPL 2021) आता अंतिम टप्प्यात येऊन ठेपला आहे. 2020 आणि 2021 साली कोरोना महामारीमुळे आयपीएल युएईमध्ये खेळवण्यात आली. कोरोनामुळे स्टेडियममध्ये जाऊन मॅच बघण्यात अडचणी येत असल्या तरी चाहत्यांना मात्र टीव्हीवर काही असे चेहरे दिसले, ज्यांनी काही तासांमध्येच सोशल मीडियावर धुमाकूळ घातला. या चेहऱ्यांना मिस्ट्री गर्ल म्हणूनही संबोधण्यात आलं. आयपीएलच्या सुरुवातीपासूनच असे अनेक चेहरे चर्चेत आले.
आदिती हुंडिया फॅशन आणि ग्लॅमरच्या दुनियेतील लोकप्रिय चेहरा आहे. 2018 साली ती मिस दिवा सुपरनॅशनल इंडिया पुरस्कारही जिंकली होती. पोलंडच्या प्रतिष्ठित मिस सुपर नॅशनल स्पर्धेमध्येही तिने भारताचं प्रतिनिधीत्व केलं. आदिती मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू इशान किशनची गर्लफ्रेंड असल्याचंही बोललं जातं. (Aditi Hundia/Instagram)