आयपीएलच्या (IPL 2021) बायो-बबलमध्ये कोरोना व्हायरसचा शिरकाव झाल्यामुळे स्पर्धा अनिश्चित काळासाठी स्थगित करण्याचा निर्णय बीसीसीआयने (BCCI) घेतला. यानंतर काही खेळाडू त्यांच्या मायदेशात परतले आहेत, तर काही अजूनही त्यांच्या घरी परतण्याच्या प्रतिक्षेत आहेत.
2/ 6
आयपीएलमध्ये भाग घेतलेल्या इंग्लंडच्या 11 खेळाडूंपैकी 8 खेळाडू बुधवारी मायदेशात परतले. यामध्ये जॉस बटलर आणि जॉनी बेयरस्टो यांचा समावेश आहे. भारताच्या 4 खेळाडूंना कोरोना झाल्यानंतर बीसीसीआयने आयपीएल स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता.
3/ 6
स्काय स्पोर्ट्सने दिलेल्या वृत्तानुसार बटलर, बेयरस्टो, सॅम करन, टॉम करन, सॅम बिलिंग्स, क्रिस वोक्स, मोईन अली आणि जेसन रॉय ब्रिटनमध्ये दाखल झाले आहेत.
4/ 6
इंग्लंडच्या मर्यादित ओव्हरचा कर्णधार इयन मॉर्गन, डेव्हिड मलान आणि क्रिस जॉर्डन पुढच्या 48 तासांमध्ये भारत सोडण्याची शक्यता आहे.
5/ 6
ब्रिटनने कोरोना महामारीमुळे भारताला रेड लिस्टमध्ये टाकलं आहे, त्यामुळे खेळाडूंना इंग्लंडला परतल्यानंतर 10 दिवस सरकारने सांगितलेल्या ठिकाणी क्वारंटाईन व्हावं लागणार आहे.
6/ 6
बीसीसीआयने सगळ्या परदेशी खेळाडूंना सुरक्षित घरी पोहोचवण्याची हमी दिली आहे. ऑस्ट्रेलियाने भारतातून येणाऱ्यांवर 15 मेपर्यंत बंदी घातली आहे, त्यामुळे ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालदीव किंवा श्रीलंकेमध्ये थांबण्याची शक्यता आहे.