भारताच्या टेस्ट टीमची भिंत असलेल्या चेतेश्वर पुजाराला वनडे आणि टी-20 टीममध्ये स्थान मिळत नाही. आयपीएलमध्येही गेली कित्येक वर्ष त्याच्यावर कोणत्याच टीमने बोली लावली नाही. यावर्षी मात्र धोनीच्या चेन्नई सुपरकिंग्सने पुजाराला 50 लाख रुपयांच्या बेस प्राईजवर विकत घेतलं. (CSK Twitter)
2/ 4
आयपीएलच्या मागच्या 6 मोसमांमध्ये पुजाराला कोणत्याही टीमने विकत घेतलं नव्हतं. 2014 साली पंजाबने पुजारावर बोली लावली होती. एवढा काळ कोणत्याच टीमने विश्वास न दाखवल्यामुळे आपल्याला त्रास झाल्याचं चेतेश्वर पुजारा म्हणाला आहे. (Cheteshwar Pujara/Instagram)
3/ 4
आयपीएलमधून बाहेर राहणं माझ्यासाठी सोपं नव्हततं. या गोष्टीने मला खूप त्रास दिला. युट्यूब शो माईंड मॅटर्समध्ये पुजारा बोलत होता. (CSK Twitter)
4/ 4
आयपीएलमध्ये कोणतीच टीम बोली लावत नसल्यामुळे मला दु:ख व्हायचं, पण या गोष्टी माझ्या हातात नव्हत्या. एका काळानंतर मी ठरवलं, की काही गोष्टींवर आपण लक्ष द्यायचं ज्या आपण आणखी चांगल्या करू शकतो, अशी प्रतिक्रिया पुजाराने दिली. (CSK Twitter)