IPL 2020 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळणार 'विराट'!
विराटला संघात घेण्यासाठी पंजाब आणि हैदराबाद यांच्यात लागली होती चुरस, अखेर सनायझर्सनं मारली बाजी.
|
1/ 5
आयपीएलच्या तेराव्या (IPL 2020) हंगामाचं बिगूल 5 दिवसांनी वाजणार आहे. 19 सप्टेंबरपासून सुरू या हंगामात युवा खेळाडूंवर सर्वांच्या नजरा आहेत. असाच एक युवा खेळाडू प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये जबरदस्त कामगिरी करून आयपीएलमध्ये पदार्पण करण्यासाठी सज्ज आहे.
2/ 5
आयपीएलच्या लिलावात विराट सिंह या युवा खेळाडूचे नाव सर्वात आघाडीवर होते. 20 लाख बेस प्राईज असलेल्या विराटवर 1.90 कोटींची बोली लागली.
3/ 5
विराटला संघात घेण्यासाठी किंग्ज इलेव्हन पंजाब आणि हैदराबाद यांच्यात चुरस रंगली होती. मात्र अखेर हैदराबादनं विराट सिंहला आपल्या संघात घेतले.
4/ 5
झारखंडचा फलंदाज विराट सिंह याचे नाव विराट असले तरी तो धोनीचा चाहता आहे. विराट भारतासाठी अंडर-19 वर्ल्ड कप खेळला आहे.
5/ 5
तर, सैयद मुश्ताक अली ट्रॉफीमध्ये त्यानं 10 सामन्यात 57.16च्या सरासरीनं 343 धावा केल्या आहेत. या स्पर्धेत त्यानं 3 अर्धशतकही लगावले होते. त्यामुळं आयपीएलमुळं भारतीय संघाला आणखी एक विराट कोहली मिळण्याची शक्यता आहे.