ऑस्ट्रेलिया दौऱ्याआधी टीम इंडियाला धक्का? आता या खेळाडूला दुखापत
आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर रवाना होणार आहे. त्याआधी टीम इंडियाला आणखी एक धक्का बसला आहे.
|
1/ 5
आयपीएल (IPL 2020) संपल्यानंतर भारतीय टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहे. तब्बल 9 महिन्यानंतर भारतीय टीम आंतरराष्ट्रीय मॅच खेळणार आहे. कोरोनानंतरचा टीम इंडियाचा हा पहिलाच दौरा असणार आहे. या दौऱ्यातल्या वनडे सीरिजला 27 नोव्हेंबरपासून सुरूवात होणार आहे.
2/ 5
ऑस्ट्रेलिया दौऱ्यात भारतीय टीम 3 वनडे, 3 टी-20 आणि 4 टेस्ट मॅचची सीरिज खेळणार आहे. यासाठी बीसीसीआयने 32 खेळाडूंच्या टीमची घोषणाही केली आहे. पण या दौऱ्याआधी टीम इंडियासाठी आणखी एक धक्का बसवणारी बातमी समोर आली आहे.
3/ 5
टीमचा विकेट कीपर ऋद्धीमान सहाच्या मांडीच्या स्नायूला दुखापत झाली आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टेस्ट सीरिजसाठी भारताला हा मोठा धक्का असू शकतो.
4/ 5
दुखापतीमुळे आयपीएलमध्ये रविवारी दिल्लीविरुद्धच्या मॅचसाठी हैदराबादकडून सहा मैदानात उतरला नाही. याआधी बँगलोरविरुद्धच्या एलिमिनेटरमध्येही तो खेळला नव्हता. (फोटो- आयपीएल ट्विटर)
5/ 5
दिल्लीविरुद्धच्या लीग स्टेजमधल्या मॅचदरम्यान सहाला दुखापत झाली होती. त्या मॅचमध्ये सहाने 45 बॉलमध्ये 87 रनची खेळी केली होती. पण तो विकेट कीपिंग करण्यासाठी आला नव्हता. त्याच्याऐवजी श्रीवत्स गोस्वामीने कीपिंग केली होती.