

विराट कोहली (Virat Kohli)च्या नेतृत्वात खेळणाऱ्या बँगलोर (RCB)चं आव्हान संपुष्टात आलं. शुक्रवारी झालेल्या एलिमिनेटर मॅचमध्ये हैदराबाद (SRH)ने बँगलोरचा 6 विकेटने पराभव केला आणि विराटच्या टीमला बाहेरचा रस्ता दाखवला.


या पराभवानंतर विराट कोहली भारताच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्याच्या तयारीला लागला आहे. भारतीय खेळाडू युएईमध्ये तयार करण्यात आलेल्या बायो बबलमध्ये गेले आहेत. कोरोना व्हायरसचा धोका लक्षात घेता हे बायो बबल तयार करण्यात आलं आहे.


आयपीएल संपताच भारतीय खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी विराट कोहलीने एक क्षणही फुकट घालवला नाही. त्यामुळेच आयपीएलमधून बाहेर झाल्यानंतर रात्री उशिरा विराट टीम इंडियाच्या बबलमध्ये गेला.


एएनआयशी बोलताना सूत्रांनी सांगितलं की हैदराबादविरुद्धची मॅच संपल्यानंतर लगेच विराट बबलमध्ये गेला. एक ते दोन दिवसानंतर विराट ऑस्ट्रेलिया दौऱ्याची तयारी सुरू करणार आहे.