

कर्णधार विराट कोहली (Virat Kohli) आणि देवदत्त पडीक्कलच्या अर्धशतकीय खेळींमुळे रॉयल चॅलेंजर्स बैंगलोर (Royal Challengers Bangalore)ने राजस्थान रॉयल्स (Rajasthan Royals)चा 8 विकेटने पराभव केला. यासोबतच आरसीबी पॉईंट्स टेबलमध्येही पहिल्या क्रमांकावर पोहोचली आहे. आयपीएल (IPL 2020)च्या 13व्या मोसमाच्या 15व्या मॅचमध्ये कोहलीने नाबाद 72 रनची खेळी केली.


आयपीएलमध्ये कोहलीचं हे 37वं अर्धशतक होतं, तर यंदाच्या मोसमातलं पहिलंच होतं. याआधीच्या हैदराबाद, पंजाब आणि मुंबईविरुद्धच्या मॅचमध्ये कोहलीने 18 रन केले होते.


कोहलीने 53 बॉलमध्ये नाबाद 72 रन केले. आयपीएलच्या 8 इनिंगनंतर कोहलीला 50 किंवा त्यापेक्षा जास्त रन करता आल्या. याआधी त्याने मागच्या मोसमात अर्धशतक केलं होतं.


राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या या खेळीनंतर विराटच्या नावावर आणखी एक विक्रम झाला आहे. आयपीएलमध्ये 5,500 रन करणारा विराट पहिलाच खेळाडू बनला आहे.