पहिल्यांदाच IPL चॅम्पियन होण्यासाठी विराट सज्ज, हे प्रमुख खेळाडू 12 वर्षांनंतर बदलणार RCBचं नशीब.
|
1/ 12
जगभरातील क्रिकेटप्रेमींसाठी पर्वणी असेलली इंडियन प्रिमिअर लीग (IPL) ही स्पर्धा यंदा कोरोनाच्या संकटामुळे पुढे ढकलण्यात आली.
2/ 12
मात्र भारतातील कोरोनाचे संकट आता आणखीनच गडद झाले असल्याने IPL होणार की नाही, अशी शंका उपस्थित करण्यात येत होती.
3/ 12
मात्र आता यंदा ही स्पर्धा होणार असल्याचं निश्चित झालं आहे. यंदाची आयपीएल स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर दरम्यान युएईमध्ये खेळवण्यात येणार आहे.
4/ 12
यादरम्यान 60 सामना होणार असल्याचे सांगितले जात आहे. पटेल पुढे म्हणाले की – अबू दाबी, दुबई, शारजाह ही तीन मुख्य ठिकाणं असणार आहे. सरकारच्या परवानगीनंतर लीगचा संपूर्ण प्लान आखण्यात येणार असल्याचे सांगितले जात आहे.
5/ 12
आयपीएलच्या आतापर्यंतच्या 12 हंगामात अनेक फलंदाजांनी शानदार कामगिरी करत अनेक विक्रम आपल्या नावावर केले आहेत. मात्र या संघाचा एकदाही आयपीएल जिंकता आलेले नाही.
6/ 12
रॉयल चॅलेंजर्स संघात अनेक दिग्गज खेळाडू आहेत. त्यामुळं अखेर 12 वर्षांनी बंगळुरू पहिल्या विजेतेपदासाठी सज्ज आहे.
7/ 12
बंगळुरू संघाबाबत बोलायचे झाल्यास, या संघाचा सर्वात यशस्वी खेळाडू आहे विराट कोहली. कर्णधार विराट कोहलीने एकहाती या संघाला अनेक सामने जिंकून दिले आहेत. एवढेच नाही तर आयपीएलमध्ये सर्वात जास्त धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत विराट दुसऱ्या क्रमांकावर आहे.
8/ 12
भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली फक्त आंतरराष्ट्रीय क्रिकेटचं नाही तर आयपीएलही गाजवत आला आहे. विराटनं 177 सामन्यात 37.84च्या सरासरीनं 5412 धावा केल्या आहेत. यात 5 शतक आणि 36 अर्धशतकांचा समावेश आहे. त्यामुळं यंदा विराट आपल्या संघाला पहिले विजेतेपद मिळवून देण्यास सज्ज आहे.
9/ 12
क्रिकेट जगतातल्या सर्वात अनोख्या खेळाडूबाबत बोलायचे झाल्यास एकच नाव सर्वांसमोर येते. हे नाव म्हणजे दक्षिण आफ्रिकेचे आक्रमक फलंदाज एबी डिव्हिलियर्स.
10/ 12
एबीला टी-20 क्रिकेटचा किंग मानले जाते. RCB संघात कोहलीनंतर एकच मॅच विनर खेळाडू आहे. त्याचे नाव आहे, एबी डिव्हिलियर्स. एबीसाठी हा आयपीएलचा हंगाम शेवटचा असू शकतो. त्यामुळं बंगुळरू संघ हा हंगाम जिंकण्यासाठी सज्ज असेल.
11/ 12
भारतीय क्रिकेट संघातील मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये युजवेंद्र चहल गेली दोन वर्षे आपल्या फिरकीने अनेक सामने जिंकून दिले आहेत. त्यामुळं विराटचा हुकुमी एक्का म्हणून चहलची ओळख आहे.
12/ 12
आयपीएलमधील रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या टीमचा भाग असलेल्या युजवेंद्र चहलने आपल्या फिरकी गोलंदाजीमुळे मोठी खेळी केली आहे. चहल हा आरसीबीच्या संघाचा एक प्रमुख भाग आहे. गेल्या काही वर्षांपासून चहल ज्या पद्धतीने कामगिरी करत राहिला तर आरसीबी नक्कीच विजेतेपदाचा दावेदार असेल.