Home » photogallery » sport » IPL 2020 UAE NO BATSMAN HIT CENTURY GLENN MAXWELL IS THE HIGHEST INDIVIDUAL RECORD UP MHPG
IPL 2020: युएइमध्ये सर्व भारतीय खेळाडू फेल! 'या' विदेशी फलंदाजाच्या नावावर सर्वात जास्त धावा
2014मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही.
|
1/ 7
इंडियन प्रीमिअर लीग (IPL 2020) स्पर्धेत षटकार आणि चौकारांचा पाऊस पडतो. जगभरातील सर्वेश्रेष्ठ फलंदाज या स्पर्धेत आतषबाजी करतात. यंदा ही स्पर्धा भारतात होणार नसून युएइमध्ये होणार आहे.
2/ 7
युएइबाबत बोलायचे झाल्यास, तेथील खेळपट्टी ही भारतासारखी पाटा नाही आहे. त्यामुळे गोलंदाजांसाठी ही खेळपट्टी पुरक आहे. म्हणूनच 2014मध्ये झालेल्या आयपीएल सामन्यांमध्ये फलंदाजांना विशेष चांगली कामगिरी करता आली नाही.
3/ 7
युएइच्या खेळपट्टीवर आतापर्यंत एकाही फलंदाजाला शतकी खेळी करता आली नाही आहे. म्हणजे विराट कोहली, सुरेश रैना, रोहित शर्मा, डेव्हिड वॉर्नर, ख्रिस गेल, एबी डिव्हिलियर्स यांसारखे फलंदाजही फेल झाले आहेत.
4/ 7
युएइमध्ये एकाही भारतीय खेळाडूला विशेष चांगली कामगिरी करता आली नाही आहे. तर, एका विदेशी खेळाडूचा रेकॉर्ड हा युएइमध्ये चांगला आहे.
5/ 7
युएइमध्ये ऑस्ट्रेलियाचा स्टार खेळाडू ग्लेन मॅक्सवेलचा रेकॉर्ड चांगला आहे. 2014मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळताना मॅक्सवेलनं तुफान फलंदाज केली होती.
6/ 7
मॅक्सवेलनं चेन्नई सुपरकिंग्ज विरुद्ध झालेल्या एका सामन्यात 43 चेंडूत 95 धावांची खेळी केली होती. यात 15 चौकार आणि 2 षटकारांचा समावेश होता.
7/ 7
यंदाच्या आयपीएलमध्येही मॅक्सवेल किंग्ज इलेव्हन पंजाब संघाकडून खेळणार आहे. फेब्रुवारीमध्ये झालेल्या लिलावात मॅक्सवेलला तब्बल 10.75 कोटी रुपयांना पंजाब संघाने विकत घेतले होते.