

यंदा आयपीएलचा तेरावा हंगाम दुबई, अबुधाबी आणि शारजाहला होणार आहे. 19 सप्टेंबरला पहिला सामना होणार असून 10 नोव्हेंबर रोजी अंतिम सामना खेळला जाणार आहे. या स्पर्धेत एकूण 10 डबल हेडर्स सामने असणार आहे.


इंडियन प्रीमिअर लीगमध्ये (IPL 2020) जेव्हा तुफानी फलंदाजांबाबत बोलले जाते तेव्हा ख्रिस गेल, एमएस धोनी, विराट कोहली, डेव्हिड वॉर्नर सारख्या फलंदाजांचे नाव घेतले जाते. मात्र आयपीएलच्या प्लेऑफ आणि फायनल सामन्यात सर्वात जलद फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांमध्ये यातील एकाचाही समावेश नाही आहे.


IPL 2020 मध्ये प्लेऑफ व अंतिम सामन्यात सर्वोत्तम स्ट्राइक रेट असलेल्या फलंदाजाबाबत बोलायचे झाल्या, यात आघाडीवर आहे मुंबई इंडियन्सचा अष्टपैलू केरन पोलार्ड. नॉकआऊट सामन्यात पोलार्डचा स्ट्राईक रेट 170हून अधिक आहे.


दुसर्या क्रमांकावर आहे चेन्नई सुपर किंग्जचा (CSK) तुफानी फलंदाज सुरेश रैना. रैनाचा प्लेऑफ व अंतिम सामन्यात स्ट्राइक 155.25 आहे. यामुळेच त्याला मिस्टर आयपीएल असेही म्हणतात.


या यादीत आणखी एक चेन्नई फलंदाजांचा समावेश आहे. तो म्हणजे शेन वॉटसन. वॉटसनचा प्लेऑफ आणि फायनल सामन्यातील स्ट्राइक रेट 151.36 आहे.


या यादीच चौथ्या क्रमांकार आहे रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा फलंदाज एबी डिव्हिलियर्स. एबीचा प्लेऑफ आणि फायनल सामन्यातील स्ट्राइक रेट 149.34 आहे.